शेअर बाजारात ऐतिहासिक घसरण:गुंतवणूकदारांमध्ये चिंतेसह भीतीचे वातावरण

07 Apr 2025 17:09:21
 
Stock market
(Image Source : Internet) 
नवी दिल्ली:
आजचा दिवस भारतीय शेअर बाजारासाठी (Stock market) अत्यंत निराशाजनक ठरला आहे. कोविड काळानंतरची सर्वात मोठी घसरण आज नोंदवण्यात आली. निफ्टी तब्बल 1000 अंकांनी आणि सेन्सेक्स 3000 अंकांनी खाली गेला. यामुळे 19 लाख कोटी रुपयांहून अधिक बाजार भांडवलाचा वायफळ झाला असून, गुंतवणूकदारांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे.
 
जागतिक आणि स्थानिक कारणांचा मिलाफ
 
1. ट्रम्प यांचा रेसिप्रोकल टॅरिफचा झटका
अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी घोषित केलेल्या प्रतिसादात्मक शुल्क धोरणामुळे (Reciprocal Tariff) जगभरात आर्थिक मंदीची भीती वाढली आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारांमध्ये घसरणीची लाट उसळली.
2. जागतिक बाजारपेठांतील नकारात्मकतेचा परिणाम
जपानचा निक्केई 7%, दक्षिण कोरियाचा कोस्पी 5%, हाँगकाँगचा हँग सेंग 10.5% घसरला. अमेरिकन आणि युरोपीय फ्युचर्समध्येही घसरण दिसून आली. या घडामोडींचा भारतीय शेअर बाजारावरही परिणाम झाला.
3. अमेरिकेत मंदीची दाट शक्यता
अमेरिकेतील ग्राहक किंमत निर्देशांकात (CPI) मार्च महिन्यात 0.3% वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे महागाईचा फटका सर्वसामान्यांपासून उद्योगांपर्यंत बसण्याची भीती आहे.
4. वाढती आर्थिक मंदी आणि व्यापार तणाव
टॅरिफ आणि व्यापार युद्धामुळे जागतिक आर्थिक हालचाली मंदावल्याचं स्पष्ट दिसतं आहे. कच्च्या तेलाच्या किमती कमी झाल्या आहेत. भारतातही ऑटोमोबाईल, आयटी, धातू, औषध आणि ऊर्जा क्षेत्रात सरासरी 7% घसरण नोंदवली गेली आहे.
5. अमेरिका-चीन व्यापार युद्धाची पुनरावृत्ती
चीनने अमेरिकन उत्पादनांवर प्रतिशोधात्मक शुल्क लावल्याने व्यापार संघर्ष पुन्हा तीव्र झाला आहे. यामुळे उत्पादन प्रक्रिया आणि नफ्यावर मोठा परिणाम होणार आहे.
6. सुरक्षित गुंतवणुकीकडे वळण
शेअर मार्केटमधील अस्थिरतेमुळे गुंतवणूकदारांनी सरकारी सिक्युरिटीज आणि यूएस ट्रेझरी बॉण्ड्स कडे वळण घेतलं आहे. यामुळे इक्विटी मार्केटमधून मोठ्या प्रमाणात पैसे बाहेर पडले आहेत.
Powered By Sangraha 9.0