मराठी कलाविश्वावर शोककळा;प्रसिद्ध अभिनेते डॉ. विलास उजवणे यांचे निधन

05 Apr 2025 13:15:04

dr vilas
(Image Source : Internet) 
मुंबई :
प्रसिद्ध अभिनेते डॉ. विलास उजवणे (Dr Vilas Ujwane) यांचं निधन झालं आहे. वयाच्या 62 व्या वर्षी उजवणे यांनी जगाचा निरोप घेतला. त्यांच्या निधनामुळे कलाविश्वावर शोककळा पसरली आहे.
 
उजवणे हे गेल्या काही दिवसांपासून गंभीर आजाराशी झुंज देत होते. त्यांना काही वर्षांपूर्वी ब्रेन स्ट्रोकही आला होता. त्याचा त्यांच्या प्रकृतीवर परिणाम झाला होता. त्यांना हृदयविकाराचाही त्रास होत होता. गंभीर आजारामुळे उपचाराचा खर्च वाढत असल्याने त्यांना आर्थिक अडचणीचाही सामना करावा लागला होता. त्यांच्या मित्र परिवाराकडून आर्थिक मदतीचे आवाहनही करण्यात आलं होतं. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना मीरा रोड येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. आज शनिवारी दुपारी त्यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार करण्यात येणार आहे.
 
Powered By Sangraha 9.0