"हॅलो, कसाबचा भाऊ बोलतोय...; मुंबई पोलिसांना निनावी फोन आल्याने खळबळ

03 Apr 2025 14:43:32
 
Mumbai Police
 (Image Source : Internet)
मुंबई :
मुंबई पोलिसांच्या (Mumbai Police) कंट्रोल रुममध्ये बुधवारी मध्यरात्री १ वाजताच्या सुमारास एक निनावी फोन आल्याने खळबळ उडाली. कारण फोन करणाऱ्या व्यक्तीनं आपण दहशतवादी अजमल कसाब याचा भाऊ बोलत असल्याचं सांगून पोलीस मुख्यालय उडवून देण्याची धमकी दिली. या प्रकारानंतर तातडीने पोलिसांनी फोन करणाऱ्या व्यक्तीचा शोध घेण्यास सुरुवात केली. काही तासांच्या आतच पोलिसांनी फोन करणाऱ्या व्यक्तीचा छडा लावला.
 
माहितीनुसार,फोन करणारा व्यक्ती २८ वर्षांचा असून तो खासगी कंपनीचा सुरक्षारक्षक आहे. मुलुंडचा रहिवासी असणाऱ्या या व्यक्तीने दारुच्या नशेत पोलिसांच्या कंट्रोल रुमला फोन केल्याचे सांगण्यात आले आहे.फोन करणाऱ्या व्यक्तीचे नाव पियूष शुक्ला असून त्याने दिलेल्या धमकीत काहीच तथ्य नसल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.
Powered By Sangraha 9.0