भारताचा जोरदार प्रतिसाद! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर बंदी

28 Apr 2025 13:08:19
 
Pakistani YouTube channels banned
 (Image Source : Internet)
नवी दिल्ली:
केंद्र सरकारने पाकिस्तानमधील १६ युट्यूब चॅनेल्सवर (YouTube channels) बंदी घालण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. २२ एप्रिल रोजी काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर या चॅनेल्सवर भारताविरोधात भडकवणारे व खोटी माहिती पसरवणारे कंटेंट दिसून आले होते. यावर भारताने त्वरित कारवाई केली आहे.
 
युट्यूबवरील या चॅनेल्सवर पाकिस्तानमधून भारताविरोधी प्रचार होणं सुरू होतं. सरकारच्या आदेशानुसार, शोएब अख्तर, आरजू काजमी आणि सय्यद मजम्मिल शाह यांच्या चॅनेल्ससह इतर १३ पाकिस्तानी चॅनेल्सवर बंदी घालण्यात आली आहे. या चॅनेल्सवर पाकिस्तानच्या दहशतवादी संघटनांचा प्रचार होत असल्याचा आरोप आहे.
 
हल्ल्यानंतर पाकिस्तानमधून भारताविरोधात भडकवणारी आणि उत्तेजक माहिती पसरवली जात होती. यावर लक्ष ठेवत, भारताने आपल्या राष्ट्रीय सुरक्षेसाठी त्वरित प्रतिक्रिया दिली. गुगल पारदर्शक रिपोर्टनुसार, बंदी घालण्यात आलेली चॅनेल्स आता भारतात उपलब्ध नाहीत.
 
केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे, पाकिस्तानविरोधी कारवाई आणखी कडक केली गेली आहे. भारताच्या सुरक्षेसाठी ही एक महत्त्वाची पावले ठरू शकतात,असे तज्ञांनी सांगितले आहे.
Powered By Sangraha 9.0