सरकारला पूर्णपणे सहकार्य करण्याची तयारी; जम्मू काश्मीर हल्ल्यावर शरद पवार यांची प्रतिक्रिया

25 Apr 2025 16:20:44
 
Sharad Pawar
 (Image Source : Internet)
नवी दिल्ली:
मंगळवारी काश्मीरमधील पहलगाममध्ये (Pahalgam) झालेल्या भयंकर दहशतवादी हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झाला असून, त्यात महाराष्ट्रातील 6 जणांचा समावेश आहे. या घटनेनंतर देशभरातून संतापाची लाट पसरली आहे. या पार्श्वभूमीवर, गुरुवारी सरकारने सर्व पक्षीय बैठक बोलावली होती. या बैठकीत विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सरकारच्या प्रत्येक कृतीला पाठिंबा दिल्याचे स्पष्ट केले.
 
या हल्ल्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. त्यांनी हल्ल्यावर विचार व्यक्त करत, सरकारला पूर्णपणे सहकार्य करण्याची तयारी दाखवली आहे.
 
शरद पवार काय म्हणाले?
शरद पवार यांनी काश्मीरमधील हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर सांगितले की, "देशावर हल्ला झाला आहे आणि अशा परिस्थितीत सगळ्यांनी सरकारला समर्थन द्यायला हवं. राजकारण बाजूला ठेवून एकजुटीने सरकारच्या पाठीशी उभं राहणं आवश्यक आहे." त्याचबरोबर, त्यांनी सरकारकडून दहशतवादावर कठोर कारवाईची अपेक्षा व्यक्त केली.
 
ते पुढे म्हणाले, आधी सरकारने दहशतवाद संपवला आहे असे सांगितले होते, पण अजूनही काही कमतरता आहेत. त्यावर तातडीने कारवाई केली पाहिजे.तसेच, आम्ही सरकारला सहकार्य करू, पण सरकारने देखील गंभीरतेने निर्णय घ्यावेत.
 
शरद पवार यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या राजीनामावर विचारले असता, "काही चूक झाल्याचे ते सांगितले आहेत, पण सध्या मला कोणाचाही राजीनामा मागायचा नाही. आता महत्त्वाचे म्हणजे दहशतवाद्यांवर कठोर कारवाई केली जावी, असे पवार म्हणाले.
Powered By Sangraha 9.0