धर्म नाही, अधर्माशी लढा; सरसंघचालक मोहन भागवतांची कठोर भूमिका

25 Apr 2025 12:32:18
 
Mohan Bhagwat
 (Image Source : Internet)
मुंबई :
पहलगाममध्ये घडलेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांनी जोरदार प्रतिक्रिया दिली आहे. मुंबईत मास्टर दीनानाथ मंगेशकर यांच्या ८३ व्या पुण्यतिथीच्या कार्यक्रमात ते बोलत होते.भागवत म्हणाले, “जगामध्ये केवळ एकच धर्म आहे आणि तो म्हणजे मानवता. आजकाल त्यालाच हिंदू धर्म म्हणतात.” या विधानाला उपस्थितांकडून जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद मिळाला.
 
देशात निर्माण झालेल्या परिस्थितीबाबत बोलताना त्यांनी स्पष्ट केलं की, ही केवळ हिंसाचाराची घटना नसून धर्म आणि अधर्म यांच्यातील लढाई आहे. त्यांनी असुरांचे निर्दालन करण्यासाठी अष्टादशभुजा शक्तीची गरज असल्याचे सांगत, रावणाचा दाखलाही दिला.
 
भागवत म्हणाले की, आपल्या देशाने कधीच धर्म विचारून कुणाला मारलं नाही. परंतु कालचा हल्ला करणारे लोक त्यांच्या संप्रदायाचा चुकीचा अर्थ लावत आहेत. अशा प्रवृत्तींना थांबवण्यासाठी देश शक्तिशाली असणं आवश्यक आहे.द्वेष आपल्या स्वभावात नसल्याचं त्यांनी सांगितलं, मात्र गरज पडल्यास शक्तीचा वापर करणंही तितकंच महत्त्वाचं असल्याचं त्यांनी ठामपणे मांडलं. समाज एकत्र राहिला, तर कोणी वाकड्या नजरेने पाहण्याची हिंमतही करणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
Powered By Sangraha 9.0