(Image Source : Internet)
मुंबई :
महाराष्ट्रातील महायुती सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेने (Ladki Bahin Yojana) महिलांमध्ये मोठी चर्चा आणि उत्सुकता निर्माण केली आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये थेट बँक खात्यात ट्रान्सफर केले जातात.
एप्रिल महिन्याचा हप्ता आणि मे महिन्याचा एकत्रित वितरण-
एप्रिल महिन्याचा हप्ता कधी मिळणार, हा प्रश्न अनेक महिलांसमोर आहे. सध्या मिळालेल्या माहितीनुसार, एप्रिल आणि मे महिन्याचा हप्ता एकत्रितपणे महिलांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. अक्षय्य तृतीया (३० एप्रिल) च्या मुहूर्तावर महिलांच्या खात्यात एकाच वेळी 3000 रुपये जमा होऊ शकतात.
आदिती तटकरे काय म्हणाल्या ?
महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी काही दिवसांपूर्वी एप्रिल महिन्याच्या हप्त्याबाबत महत्त्वाचे वक्तव्य केले होते. त्यात त्यांनी सांगितले होते की, "एप्रिल महिन्याच्या अखेरीस महिलांच्या खात्यात पैसे जमा केले जातील.लाडकी बहिणींसाठी ९ हप्ते आतापर्यंत जमा झाले आहेत, आणि आता १०व्या हप्त्याची अपेक्षा आहे.
योजना तपासणी आणि अपात्र महिलांची निवड-
सद्याच्या प्रक्रियेत महिलांच्या अर्जाची पडताळणी केली जात आहे. उत्पन्नाच्या निकषानुसार काही महिलांना अपात्र ठरवून योजनेतून वगळले जात आहे. ज्या महिलांचा पगार योग्य निकषावर बसत नाही, त्यांना योजनेचा लाभ मिळणार नाही.