(Image Source : Internet)
पहलगाम (जम्मू-काश्मीर):
पहलगाममध्ये (Pahalgam) पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर चारही दहशतवाद्यांचे फोटो आता उघड झाले आहेत. लष्करी वेशात आणि AK-47 रायफल्ससह सज्ज असलेले हे दहशतवादी एका ठिकाणी उभे असलेला फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे.
यापूर्वी सुरक्षा यंत्रणांनी या चार दहशतवाद्यांचे अनुमानित स्केच जाहीर केले होते. काहीच वेळात त्यांचे खरे फोटो समोर येताच तपासाला वेग मिळाल्याचे सूत्रांकडून कळते. हा फोटो हल्ल्याआधी काढलेला असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
हल्ल्यावेळी हे दहशतवादी लष्करी पोशाखात होते आणि त्यांनी अचानक गोळीबार सुरू केला. या अमानुष हल्ल्यात २८ निष्पाप पर्यटकांचा मृत्यू झाला असून, त्यामध्ये दोन परदेशी नागरिकांचाही समावेश आहे. 'लष्कर-ए-तोएबा'च्या 'रेझिस्टन्स फ्रंट' या गटाने या भ्याड हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.
या घटनेनंतर देशभरात संतापाची लाट उसळली असून, सुरक्षादले हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी सतत कारवाई करत आहेत.