नागपूर विधानसभा भवन विस्ताराला गती; सभापतींनी दिले महत्त्वाचे निर्देश

    21-Apr-2025
Total Views |
 
Nagpur Assembly
 (Image Source : Internet)
नागपूर :
नागपूरच्या विधानसभा (Nagpur Assembly) भवन संकुलाच्या विस्तारासाठी महत्त्वाचे निर्णय घेतले गेले आहेत. विधानसभेचे सभापती राम शिंदे यांनी संबंधित अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली, ज्यामध्ये विस्तार प्रकल्पाला गती देण्यावर भर देण्यात आला. आगामी काळात सदस्यसंख्या वाढण्याची शक्यता लक्षात घेता, अधिक बैठक व्यवस्था आणि सुविधा वाढवण्याच्या सूचना देण्यात आल्या.
 
सभापती शिंदे म्हणाले, "जसे दिल्लीमध्ये नव्या संसद भवनाच्या कामांना गती मिळाली, त्याचप्रमाणे नागपूर विधानसभा भवन विस्ताराच्या कामालाही वेग द्यावा लागेल." यावेळी, सार्वजनिक बांधकाम विभागाला १४ महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करून मार्गदर्शन केले.
 
हिवाळी अधिवेशनासाठी दरवर्षी मोठा खर्च होतो. त्यासाठी, अशा योजनांचा विचार करावा लागेल जे वर्षभर उपयोगात येतील आणि देखभालीच्या खर्चात बचत होईल, असे त्यांनी स्पष्ट केले.विधानसभा भवनासमोरील एन कुमार हॉटेल्सच्या अपूर्ण इमारतीवर सरकारचा कब्जा होणार आहे. त्यासाठी, नवीन मूल्यांकन करून प्रस्ताव उच्चस्तरीय समितीकडे सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
 
तसेच, वन विभागाच्या शेजारील जमिनीचे हस्तांतरण करून ती जागा विधानसभा भवनाच्या विस्तारासाठी वापरण्याचा विचार सुरू असल्याचे सभापतींनी सांगितले.