(Image Source : Internet)
नागपूर :
राज्यातील अनेक भागात अवकाळी पावसाने (Unseasonal rains) हजेरी लावली आहे. हवामान खात्याने बुधवारी, गुरुवारी राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये गारपिटीसह अवकाळी पावसाचा अंदाज वर्तविला आहे. त्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. पुणे, नाशिक, नगर, जळगाव, सातारा, जालना, छत्रपती संभाजीनगर येथे विजांच्या कडकडाटासह पावसाची किंवा काही ठिकाणी गारपीटची शक्यता आहे.
मध्य महाराष्ट्रातील बहुतांश ठिकाणी पावसाचा ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला आहे. बुधवार आणि गुरूवारसाठी ‘ऑरेंज अलर्ट’ आहे. नंतर तो ‘येलो अलर्ट’ असेल, अशी माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे. 4 आणि 5 तारखेला पूर्वेकडे स्थलांतरीत होऊन विदर्भात पाऊस पडण्याची शक्यता आहे. राज्यात पुढील चार दिवस अवकाळी पावसासाठी पोषक हवामान आहे. तर पुणे, अहिल्यानगर, जळगाव, नाशिक, सातारा, छत्रपती संभाजीनगर, जालना, चंद्रपूर, अमरावती आणि बीड या 10 जिल्ह्यांमध्ये गारपीटीचा अंदाज हवामान विभागाने दिला.
नागपुरात आज वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा -
भारतीय हवामान विभागाने (IMD) विदर्भातील विविध जिल्ह्यांसाठी पुढील 3 ते 4 दिवसांसाठी येलो अर्लट जारी केले आहे. या काळात वादळी वारे, विजांच्या कडकडाटासह गारपीट होण्याची शक्यता आहे. नागपूर आणि वर्धा जिल्ह्यांमध्ये 2 एप्रिल रोजी पाऊस आणि गडगडाटीची शक्यता आहे.