बुलढाण्यात भीषण अपघात, 5 जणांचा मृत्यू

    02-Apr-2025
Total Views |
 
accident in Buldhana
 (Image Source : Internet)
बुलढाणा:
बुलढाणा (Buldhana) जिल्ह्यातील शेगाव-खामगाव महामार्गावर एक तिहेरी अपघाताची घटना घडली आहे. या भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू झाल्याची माहिती पुढे आले आहे.
 
खाजगी प्रवासी बस, एसटी बस आणि बोलेरो या तीन वाहनामध्ये हा भीषण अपघात झाला आहे.
 
माहितीनुसार, आज सकाळी साडेपाचच्या सुमारास भरधाव बोलेरो कार एसटी बसवर धडकली. त्यानंतर पाठीमागून येणारी खाजगी प्रवासी बस ही या अपघातग्रस्त वाहनांना धडकली. या भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला असून 24 जण जखमी आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पुढील कारवाई सुरू केली आहे. तर जखमींवर खामगाव येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे. हा अपघात कसा घडला याबाबत कोणतीच माहिती समोर आलेली नाही.