"बाळासाहेब ठाकरे असते तर..."; वक्फ विधेयकावरून श्रीकांत शिंदेंची ठाकरे गटावर टीका

02 Apr 2025 21:17:45
 
Shrikant Shinde criticizes Thackeray
 (Image Source : Internet)
नवी दिल्ली:
वक्फ सुधारणा विधेयक (Waqf Amendment Bill) आज (2 एप्रिल) लोकसभेत सादर करण्यात आले असून, त्यावर जोरदार चर्चा सुरू आहे. हे विधेयक मंजूर करण्यासाठी एनडीए पूर्णतः सज्ज आहे. या चर्चेत शिवसेना (शिंदे गट) खासदार श्रीकांत शिंदे यांनीही सहभाग घेतला. विधेयकाचे समर्थन न करणाऱ्या ठाकरे गटावर तीव्र हल्ला चढवला.
 
शिंदे म्हणाले, "आज जर बाळासाहेब ठाकरे असते आणि त्यांनी युबीटीची डिसेंट नोट वाचली असती, तर त्यांच्या आत्म्याला प्रचंड वेदना झाल्या असत्या. मी येथे युबीटीची असहमती नोट घेऊन आलो आहे. यात त्यांनी म्हटले आहे की, गैर-मुस्लिम सदस्य वक्फ बोर्डमध्ये नसावेत आणि त्यावर ते शिष्टाई करत आहेत. बाळासाहेब नेहमी हिंदुत्वासाठी लढत होते. मला वाटले यांना केवळ हिंदुत्वाची ॲलर्जी होती, मात्र आज युबीटीला हिंदूंचीही ॲलर्जी होऊ लागली आहे."
 
शिंदे यांच्या या टीकेनंतर ठाकरे गटाच्या खासदारांकडून जोरदार प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता आहे. वक्फ सुधारणा विधेयकावरून राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे दिसत आहेत.
Powered By Sangraha 9.0