(Image Source : Internet)
मुंबई :
आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर मराठवाड्यात शिवसेना नेत्यांनी ठाकरेंची साथ सोडल्याचे पाहायला मिळत आहे.विधानसभा निवडणुकांवेळी शिवसेना उबाठा पक्षात प्रवेश केलेल्या आणि शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार आणि मंत्री संजय शिरसाठ यांच्याविरुद्ध निवडणूक लढवलेल्या राजू शिंदे यांनी शिवसेना उबाठा पक्षाची साथ सोडली आहे. अखेर, राजू शिंदे यांनी उद्धव ठाकरेंच्या सेनेला जय महाराष्ट्र करत नव्या राजकीय प्रवेशाचीवाट धरली आहे.
राजू शिंदे यांनी उद्धव ठाकरे गटाकडून संजय शिरसाठ यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. मात्र, राजीनामा देताना चंद्रकांत खैरे यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी दर्शवत राजू शिंदे यांनी आपल्या समर्थकांसह पदाचा आणि शिवसेना उबाठा सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे, मराठवाड्यात ठाकरे यांची ताकद कमी होतांना दिसत आहे.