आमदार विकास ठाकरेंच्या कार्यालयात झोपेच्या गोळ्या खाऊन पोहोचला व्यक्ती, प्रकृती बिघडली, नेमके कारण काय?

02 Apr 2025 17:02:34
 
MLA Vikas Thackeray office
 (Image Source : Internet)
नागपूर :
उपराजधानी नागपूरमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जिथे पोलिस आणि महापालिका अधिकाऱ्यांच्या छळाला कंटाळून एका व्यक्तीने झोपेच्या गोळ्या घेतल्या. यानंतर, ती व्यक्ती आपली तक्रार घेऊन विकास ठाकरे (Vikas Thackeray) यांच्या कार्यालयात पोहोचली, जिथे त्या व्यक्तीची प्रकृती बिघडली.आमदार कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी त्या व्यक्तीला उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
 
रॉबर्ट रोमन फ्रान्सिस (५०, रा. सिव्हिल लाईन्स, नागपूर) असे या व्यक्तीचे नाव आहे. झोपेच्या गोळ्या घेण्यापूर्वी त्याने एक सुसाईड नोट लिहिली ज्यामध्ये त्याने पोलिस आणि महापालिका अधिकाऱ्यांवर अनेक गंभीर आरोप केले.
 
मिळालेल्या माहितीनुसार, बिशप कॉटन ग्राउंडच्या कोपऱ्यात रॉबर्ट रोमन फ्रान्सिसचा एक कॅफे होता. सुसाईड नोटनुसार, १९९९ मध्ये शाळा व्यवस्थापनाने कॅफे चालवण्यासाठी जमीन दिली होती. २०१३ पर्यंत ते कोणत्याही अडचणीशिवाय चालत राहिले. मात्र आता मनपाने ७ मार्चला त्यावर हातोडा चालवला. या नैराशेतून रॉबर्ट याने हे पाऊल उचलले.
Powered By Sangraha 9.0