नागपूर पोलिसांचे 'ऑपरेशन शोध';हरवलेल्या महिला व बालकांच्या शोधासाठी विशेष मोहीम

    18-Apr-2025
Total Views |
 
Nagpur Police Operation Search
 (Image Source : Internet)
नागपूर:
शहर पोलिसांनी हरवलेल्या महिला व बालकांचा शोध घेण्यासाठी 'ऑपरेशन शोध' (Operation Search) ही विशेष मोहीम सुरू केली आहे. ही मोहीम १७ एप्रिल ते १५ मे २०२५ दरम्यान राबविण्यात येणार आहे.
राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाच्या (NCRB) २०२२ च्या अहवालानुसार, महाराष्ट्र हरवलेल्या महिलांच्या बाबतीत देशात दुसऱ्या क्रमांकावर असून, बालकांच्या प्रकरणांत प्रथम क्रमांकावर आहे. या पार्श्वभूमीवर, मार्च २०२५ मध्ये पार पडलेल्या गुन्हेगारी परिषदेच्या दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या संदर्भात कठोर उपाययोजना करण्याचे निर्देश वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना दिले होते.
'ऑपरेशन शोध' अंतर्गत नागपूर शहरातील प्रत्येक उपविभागीय पातळीवर विशेष पथकांची नेमणूक करण्यात आली आहे. या पथकांमध्ये एक पोलीस अधिकारी, एक महिला पोलीस कर्मचारी व तीन पोलीस शिपाई असणार आहेत. याशिवाय, गुन्हे शाखेची मानव तस्करी विरोधी शाखा (AHTU) देखील या मोहिमेत सक्रियपणे सहभागी होणार आहे.
 
या मोहिमेद्वारे हरवलेल्या नागरिकांचा शोध घेण्यासोबतच मानव तस्करी व संबंधित गुन्ह्यांना आळा घालण्याचा प्रयत्नही केला जाणार आहे. नागपूर पोलिसांनी नागरिकांना या मोहिमेत सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.
या मोहिमेत महिला व बालकांसाठी काम करणाऱ्या अशासकीय संस्था, बाल कल्याण समिती, महिला व बाल विकास विभाग, जिल्हा बाल सुरक्षा कक्ष यांचा सहभाग असणार आहे. शोध मोहीम कालावधीत रेल्वे स्थानक, बस स्थानक, पर्यटन स्थळ, धार्मिक स्थळ इत्यादी ठिकाणी फिरणाऱ्या अल्पवयीन बालकांची माहिती घेण्यात येणार आहे. भीक मागणारे, वीटभट्टी, हॉटेल, अशा ठिकाणी बेकायदेशीरपणे काम करणारी अल्पवयीन बालके अशा बालकांना हरवलेली बालके समजून, फोटोघेवून त्यांची चौकशी करण्यात येणार आहे.
नागपूर पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, हरवलेल्या महिला आणि बालकांबाबत कोणतीही माहिती असल्यास तात्काळ नजीकच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा. ही मोहीम के नांची नाही, तर संपूर्ण समाजाची आहे.