(Image Source : Internet)
मुंबई:
18 एप्रिल रोजी भारतात सोन्याचे (Gold) दर पुन्हा एकदा वाढताना दिसत आहेत. आज 24 कॅरेट सोन्याचा प्रति ग्रॅम दर 9,732 रुपयांवर पोहोचला आहे. 22 कॅरेट सोन्याचा प्रति ग्रॅम दर 8,921 रुपये तर 18 कॅरेट सोनं प्रति ग्रॅम 7,300 रुपये इतकं नोंदवलं गेलं आहे.
आज 22 कॅरेट सोन्याचा प्रति 10 ग्रॅम दर 89,210 रुपये, तर 24 कॅरेटसाठी तो 97,320 रुपये इतका झाला आहे. 18 कॅरेट सोनं प्रति 10 ग्रॅम 73,000 रुपयांवर पोहोचले आहे.
यासोबतच चांदीच्या दरातही मोठी वाढ झाली असून, आज चांदीचा प्रति ग्रॅम दर 99.90 रुपये तर प्रति किलोग्रॅम दर 99,900 रुपये इतका आहे.
सोनं आणि चांदीच्या दरांमध्ये होत असलेल्या या वाढीने गुंतवणूकदार आणि ग्राहकांमध्ये चर्चेला उधाण आलं आहे.