दुबईत पाकिस्ताने नागरिकांकडून तलवारीने दोन भारतीयांवर हल्ला; दोन्ही मजुरांचा मृत्यू

16 Apr 2025 20:47:30
 
Dubai
(Image Source : Internet) 
दुबई :
दुबईमधील (Dubai) एका नामांकित बेकरीमध्ये घडलेली हृदयद्रावक घटना सध्या सर्वत्र खळबळ उडवत आहे. एका पाकिस्तानी नागरिकाने अचानक तलवारीने जोरदार हल्ला करून दोन भारतीय मजुरांचा जागीच जीव घेतला. या घटनेदरम्यान, संबंधित व्यक्तीने धार्मिक नारेही दिल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
 
ही दुर्घटना ११ एप्रिल रोजी घडली असून मृतांमध्ये तेलंगणातील दोन युवकांचा समावेश आहे. त्यांची नावे अष्टपू प्रेमसागर आणि श्रीनिवास अशी ओळख पटली आहे. प्रेमसागर हे निर्मल जिल्ह्यातील सोन गावचे रहिवासी होते, तर श्रीनिवास निजामाबाद जिल्ह्यातून दुबईत कामानिमित्त आले होते. दोघेही संबंधित बेकरीमध्ये गेल्या काही वर्षांपासून काम करत होते.
कुटुंबीय शोकाकुल, सरकारकडून सहाय्याची मागणी
 
प्रेमसागरच्या कुटुंबीयांनी सांगितले की तो गेल्या पाच-सहा वर्षांपासून दुबईत काम करत होता. दोन वर्षांपूर्वी तो शेवटचा भारतात आला होता. त्याच्या मागे पत्नी आणि दोन अपत्य आहेत. सध्या कुटुंबीय अत्यंत धक्क्यात असून, अजूनही त्यांना मृत्यूची अधिकृत माहिती दिलेली नाही.
 
मृतदेह भारतात आणण्यासाठी कुटुंबीयांनी केंद्र सरकारकडे सहाय्याची मागणी केली आहे. केंद्रीय मंत्री जी. किशन रेड्डी यांनी परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्याशी याबाबत चर्चा केली असून लवकरात लवकर मदत मिळावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
Powered By Sangraha 9.0