(Image Source : Internet)
मुंबई :
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या राज्यसभा खासदार प्रियंका चतुर्वेदी (Priyanka Chaturvedi) यांनी पक्ष सोडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) प्रवेश करण्याची तयारी दर्शवल्याची माहिती समोर आली आहे. त्यांनी अलीकडेच पार्थ पवार आणि प्रफुल्ल पटेल यांची भेट घेतली असून, पक्षात सामील होण्याची इच्छा व्यक्त केली आहे .
प्रियंका चतुर्वेदी यांचा राज्यसभेतील कार्यकाळ पुढील ११ महिन्यांत संपत आहे. त्यामुळे पुन्हा निवडून येण्याच्या शक्यता कमी असल्याने त्यांनी हा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे. अलीकडेच त्यांनी एका पॉडकास्टमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक केले होते, ज्यामुळे त्यांच्या राजकीय भूमिकेत बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान सर्व घडामोडींवर प्रियंका चतुर्वेदी यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. त्यांनी म्हटलंय की, एक तृतीय श्रेणीचा पत्रकार कॉर्पोरेट क्लायंटसाठी अजेंडा वापरतोय. तो माझ्याबद्दल खोटे पसरवू लागला आहे. या दयनीय व्यक्तीने आधीही प्रयत्न केले होते, आता त्याने पुन्हा त्याच्या इशाऱ्यावर काम सुरू केले आहे,असे त्या म्हणाल्या.