-संघटनेत मोठे बदल होणार
(Image Source : Internet)
मुंबई :
राज्यातील विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला जबरदस्त फटका बसला असून, सर्वाधिक नुकसान ठाकरे गटाचं झालं आहे. निवडणूक निकालानंतर पक्षात मोठ्या प्रमाणात गळती सुरू झाली असून, कार्यकर्ते आणि माजी नगरसेवक उद्धव ठाकरेंना रामराम करत आहेत.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटात नव्याने संघटना बांधणीसाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. सूत्रांनुसार, आता पक्षाची सूत्रे आदित्य ठाकरेंकडे देण्याची तयारी सुरू असून, यासाठी संघटनेत मोठे बदल होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, माजी खासदार चंद्रकांत खैरे आणि आमदार अंबादास दानवे यांच्यातील वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. हे वाद नवीन नसले तरी सध्या ते उघडपणे समोर येत आहेत.
वरिष्ठ नेत्यांमध्ये अस्वस्थता वाढली असून, पक्षात अंतर्गत धुसफूस तीव्र झाली आहे. ठाकरे गटाला डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न सुरू असला तरी त्याला फारसा यश आलेलं नाही.
पक्षाला सावरण्यासाठी ठाकरे कुटुंब आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वावर भर देत असून, लवकरच मोठे निर्णय घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे.