नागपूर शिक्षक भरती गैरव्यवहार मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश

15 Apr 2025 13:34:59
 
CM orders inquiry
 (Image Source : Internet)
नागपूर :
नागपूर जिल्ह्यात शिक्षक भरती (Teacher recruitment) प्रक्रियेत मोठा घोटाळा समोर आला असून, सुमारे 580 शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची नियुक्ती बनावट कागदपत्रांच्या आधारे करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकारामुळे सरकारी निधीचा कोट्यवधींचा अपव्यय झाल्याचे उघड झाले आहे. शिक्षण विभागानेही या गैरप्रकाराला दुजोरा दिला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची सखोल पोलिस चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
 
दोषींवर कडक कारवाईची तयारी; वेतन परत घेण्याची शक्यता -
मुख्यमंत्री फडणवीस यांनी यामध्ये सहभागी असणाऱ्यांवर कोणतीही गय न करता कठोर पावले उचलण्यात येतील, असे जाहीर केले आहे. बनावट कागदपत्रांच्या आधारे नोकरी मिळवलेल्या व्यक्तींनी आजवर घेतलेले वेतन परत करण्याची कार्यवाहीही सुरू केली जाणार आहे.
 
भरतीत कोट्यवधींचा आर्थिक व्यवहार-
या प्रकरणात, प्रत्येक जागेसाठी २० ते ३५ लाख रुपयांची लाच घेण्यात आल्याचे तपासात उघड झाले आहे. काही अधिकाऱ्यांच्या संगनमताने बनावट शालार्थ आयडी तयार करून उमेदवारांना नोकऱ्या देण्यात आल्या. या व्यक्तींना नियमित वेतन दिले जात होते, हे देखील स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आता या घोटाळ्याशी संबंधित आर्थिक व्यवहारांची चौकशीही केली जाणार आहे.
Powered By Sangraha 9.0