"सामना"अग्रलेख उद्धव ठाकरेंचे राजकीय अस्तित्व संपविण्यासाठीच लिहिले जातायत; बावनकुळे टीका

14 Apr 2025 17:48:22
 
Bawankule Thackeray
 (Image Source : Internet)
मुंबई :
शिवसेनेच्या ‘सामना’ या मुखपत्रातील अग्रलेख सध्या राजकीय चर्चेचा विषय ठरत आहेत. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी या अग्रलेखांवरून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांच्यावर ताशेरे ओढले आहेत. त्यांनी स्पष्टपणे आरोप केला की, "हे लेख उद्धव ठाकरेंचं राजकीय आयुष्य संपवण्यासाठीच लिहिले जात आहेत."
 
एका चित्रपटावरून उफाळलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर बोलताना, बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्व क्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. "फडणवीस सरकारने महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना ‘भारतरत्न’ मिळावा म्हणून प्रयत्न केले, पण ठाकरे सरकारच्या काळात असा विचारही झाला नाही,असे म्हणत त्यांनी थेट ठाकरेंच्या कार्यकाळावर निशाणा साधला.
 
बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंविषयी वापरलेली भाषा देखील लक्षवेधी होती. "अकलेचा कांदा" आणि "बिनबुडाचा चंबू" या उपमांद्वारे त्यांनी ठाकरेंच्या सध्याच्या राजकीय भुमिकेचा समाचार घेतला. सत्ता गेल्यानंतर उद्धव ठाकरे फक्त टीका करणारे नेतृत्व बनले आहे, असा उपरोधिक टोला त्यांनी लगावला.
Powered By Sangraha 9.0