(Image Source : Internet)
नागपूर :
शिक्षण विभागाशी संबंधित सुमारे सहा-सात वर्षांपूर्वी घडलेल्या घोटाळ्याबाबत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. या प्रकरणात त्यांनी निष्पक्ष व सखोल चौकशीची मागणी केली असून दोषींवर कठोर कारवाई करण्याचा आग्रह धरला आहे.
वडेट्टीवार म्हणाले, ही बाब उपसंचालकांपर्यंत कशी पोहोचली याची माहिती नाही, कारण फाईल प्रक्रिया खालून सुरू होते आणि अनेक शिक्षण अधिकाऱ्यांचा यात सहभाग असतो. उपसंचालकाची भूमिका केवळ वेतन सुरू करण्यापुरती मर्यादित असते.
त्यांनी पुढे सांगितले की, पोलीस तपास कुठल्या दिशेने सुरू आहे याची माहिती घेतली जात आहे आणि यामध्ये कोणतीही अनियमितता आढळल्यास संबंधित व्यक्तीवर कठोर कारवाई केली जाईल.