उमरेड एमआयडीसीतील ॲल्युमिनियम फॉइल फॅक्टरीत भीषण स्फोट; पाच जणांचा मृत्यू

    12-Apr-2025
Total Views |
 
Umred MIDC
 (Image Source : Internet)
उमरेड :
उमरेड एमआयडीसी (Umred MIDC) परिसरातील एका ॲल्युमिनियम फॉइल उत्पादन करणाऱ्या फॅक्टरीत आज सकाळी भीषण स्फोट झाला. या स्फोटात पाच कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत.मृतांमध्ये निखिल निहारे (२४), निखिल शेंडे (२५), अभिषेक जांगड (२०), पीयूष वासुदेव दुर्गे (२१) आणि सचिन पुरुषोत्तम मसराम (२६) यांचा समावेश आहे.
 
स्थानिक प्रशासन आणि अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले असून, बचाव कार्य सुरु आहे. जखमींना नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
 
स्फोटाचे कारण अद्याप अस्पष्ट असून, प्राथमिक माहितीनुसार फॅक्टरीतील बॉयलरमधील बिघाडामुळे हा स्फोट झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. पोलिसांनी तपास सुरू केला आहे.