(Image Source : Internet)
नागपूर:
आज हनुमान जयंतीनिमित्त (Hanuman Jayant) नागपूर शहरात भक्तिभावाचं अनोखं वातावरण पाहायला मिळाले. सकाळपासूनच शहरातील विविध प्रसिद्ध आणि स्थानिक हनुमान मंदिरांमध्ये भाविकांनी दर्शनासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली. भक्तांनी प्रभू हनुमानाची विधीवत पूजा, अभिषेक आणि अर्चा करून आपल्या कुटुंबाच्या आरोग्य, सुख-शांतीसाठी प्रार्थना केली. परिसर ‘जय श्रीराम’ आणि ‘बजरंग बली की जय’ च्या घोषणांनी दुमदुमून गेला.
तेलनखेडी, सीताबर्डी, महाल आणि इतर भागांतील हनुमान मंदिरांमध्ये विशेष पूजा विधी, हवन, सुंदरकांड पठण व भजन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. मंदिरांना आकर्षक फुलांच्या माळा व रोषणाईने सजवण्यात आले होते.
उत्सव शांततेत साजरा होण्यासाठी पोलिस प्रशासनाने सुरक्षेचे चोख बंदोबस्त केले होते. नागपूरकरांमध्ये या दिवशी विशेष उत्साह आणि श्रद्धा दिसून आली. संपूर्ण शहर भक्तीमय वातावरणात रंगले होते.
जामसावली मंदिरात भव्य पूजा व ५६ प्रकारच्या नैवेद्याचा महाप्रसाद-
प्रख्यात जामसावली हनुमान मंदिरात मध्यरात्रीपासूनच भाविकांची रीघ लागलेली होती. पहाटेच्या शुभमुहूर्तावर विशेष आरती झाली. यावेळी हनुमानजींना ५६ भोग अर्पण करून महाप्रसाद वाटप करण्यात आला.