आम्ही पक्षाचे लोक फोडतो, तसं तुम्ही इंग्रजी शाळेतील विद्यार्थी फोडा; गुलाबराव पाटलांच्या विधानाच्या चर्चा

12 Apr 2025 23:05:37
 
Gulabrao Patil
 (Image Source : Internet)
जळगाव :
राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी एका कार्यक्रमात केलेल्या विधानामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. त्यांनी म्हटले, आम्ही पक्षाचे लोक फोडतो, तसं तुम्ही इंग्रजी शाळेतील विद्यार्थी फोडा आणि मराठी शाळांमध्ये आणा.
 
हे विधान करताना ते जिल्हा परिषद शाळांमध्ये सुरू असलेल्या सुधारणा आणि मराठी माध्यमाच्या शाळांची पटसंख्या वाढवण्याच्या प्रयत्नांचा उल्लेख करत होते. त्यांनी सांगितले की, यावर्षी मराठी शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या वाढली आहे, आणि अनेक ठिकाणी नव्या खोल्यांचे बांधकाम तसेच दुरुस्तीची कामे सुरू आहेत.
 
मात्र, या विधानावर विरोधी पक्षांकडून टीका झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अनिल पाटील यांनी सांगितले, "फोडाफोडीचे राजकारण हे राजकीय क्षेत्रापुरतं मर्यादित असावे, ते शिक्षणात येऊ नये,असे ते म्हणाले.या विधानामुळे शिक्षण धोरणांवर आणि मराठी शाळांच्या भवितव्यावर नव्याने चर्चा रंगू लागली आहे.
Powered By Sangraha 9.0