(Image Source : Internet)
नागपूर :
अवकाळी पावसामुळे राज्यातील अनेक भागात शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असताना काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी राज्य सरकारवर तीव्र शब्दात टीका केली आहे. वडेट्टीवार म्हणाले, शेतकरी अडचणीत असताना सरकार त्यांच्याशी शत्रूसारखं वागत आहे.
पंचनामा करायलाही सरकार तयार नाही.वडेट्टीवार यांनी सरकारला इशारा देत म्हटले की, तत्काळ पंचनामा करून शेतकऱ्यांना योग्य तो मोबदला द्या, अन्यथा आंदोलन उभारण्यात येईल.