(Image Source : Internet)
मुंबई :
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव जय पवार (Jai Pawar) आणि उद्योजक प्रवीण पाटील यांची कन्या ऋतुजा पाटील यांचा साखरपुडा आज पुण्यातील घोटावडे येथील फार्महाऊसवर पारंपरिक पद्धतीने पार पडला. या खास सोहळ्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार, प्रतिभा पवार, सुप्रिया सुळे, प्रतापराव पवार यांच्यासह पवार कुटुंबातील सर्वजण उपस्थित होते.
फार्महाऊस परिसरात भव्य सजावट, विद्युत रोषणाई आणि सांस्कृतिक वातावरणात हा सोहळा पार पडला. निमंत्रित खास मंडळींच्या सान्निध्यात पार पडलेल्या या कार्यक्रमात जय आणि ऋतुजा यांनी पांढऱ्या रंगातील समन्वय साधलेले पारंपरिक पोशाख परिधान केले होते.
फलटण येथील प्रसिद्ध उद्योजक प्रवीण पाटील यांची कन्या ऋतुजा पाटील या सोशल मीडिया क्षेत्रात कार्यरत असून उच्चशिक्षित आहेत. जय आणि ऋतुजा हे एकमेकांना पूर्वीपासून ओळखत असून आता त्यांच्या नात्याला अधिकृत मान्यता मिळाली आहे.