नागपूरच्या कामठीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाचे महसूल मंत्री बावनकुळे यांच्या हस्ते उद्घाटन !

    11-Apr-2025
Total Views |
 
Bawankule
 (Image Source : Internet)
नागपूर :
महाराष्ट्राचे प्रेरणास्थान आणि अभिमान छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्या सन्मानार्थ कामठी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात उभारण्यात आलेल्या आकर्षक स्मारकाचे भव्य उद्घाटन राजस्व मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते पार पडले. नव्याने बांधण्यात आलेल्या आणि आकर्षक प्रकाशयोजनेने सजवलेल्या या स्मारकामुळे परिसरात नवचैतन्य निर्माण झाले आहे.
 
या कार्यक्रमाला माजी आमदार टेकचंद सावरकर, अनिल निधान, अरविंदजी कुकडे, आरएसएसचे प्रांत सह संपर्कप्रमुख दत्ताजी शिर्के, युवा चेतना मंचाचे राष्ट्रीय सचिव यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. शिवभक्तांची मोठी गर्दी ही कार्यक्रमाची शोभा वाढवणारी ठरली.
 
कार्यक्रमाचे वैशिष्ट्य ठरले २५१ सौभाग्यवती महिलांनी एकत्रितरित्या केलेली भव्य महाआरती, ज्यामुळे वातावरण भक्तिमय आणि उत्साहपूर्ण झाले. ढोल-ताशांच्या गजरात व रंगीबेरंगी आतषबाजीत शिवप्रतिमेचे अनावरण मोठ्या उत्साहात पार पडले.
दरम्यान हे स्मारक छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचे प्रतीक असून, येथील नागरिकांच्या श्रद्धेचा केंद्रबिंदू ठरणार आहे. या ऐतिहासिक क्षणाचे आयोजन श्री शिव नित्य पूजन समिती व श्रीमंत योगी स्मारक समिती युवा चेतना मंच यांनी संयुक्तपणे केले.