भाजपने राजकारण न करता मुंबई दहशतवादी हल्ल्याचा आरोपी तहव्वुर राणाला फाशीची शिक्षा द्यावी: विजय वडेट्टीवार

10 Apr 2025 16:31:39
 
Vijay Wadettiwar
 (Image Source : Internet)
नागपूर:
भाजपने कोणतेही राजकारण न करता 2008 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यापैकी एक मुख्य आरोपी तहव्वुर राणाला फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी केली आहे.
 
वडेट्टीवार म्हणाले, राणाला लवकरात लवकर भारतात आणून फाशी द्यावी. मुंबईवर हल्ला करून इतक्या लोकांचा बळी घेणाऱ्याला माफ करू नये. या प्रकरणाचं राजकारण होऊ नये.
 
भाजपने आगामी निवडणुकांमध्ये मतांसाठी राणाचं नाव वापरू नये. जर त्यांनी दाऊद इब्राहिमला भारतात आणण्यात यश मिळवले असते तर ती भाजपसाठी मोठी उपलब्धी ठरली असती. कारण या हल्ल्यामध्ये दाऊद इब्राहिमचाच मुख्य सहभाग होता.
 
वडेट्टीवार म्हणाले, राणाला देशात आणून फाशी दिली पाहिजे. पण येणाऱ्या महापालिका निवडणुकांसाठी या प्रकरणाचा राजकीय उपयोग करू नये. सरकारने हेही उत्तर दिलं पाहिजे की त्याला देशात आणण्यासाठी 15 वर्षं का लागली? भाजप त्याला निवडणुकांसाठी वापरेल, हे होऊ नये.
 
26/11 मुंबई दहशतवादी हल्ल्याचा आरोपी तहव्वुर राणाला आज भारतात आणण्यात येणार आहे. केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी सोशल मीडियावर पोस्टद्वारे ही माहिती दिली. अमेरिकेतून विशेष विमानाद्वारे त्याला भारतात आणलं जात आहे, अशी माहिती आहे. दरम्यान, एनआयए मुख्यालय, पटियाला कोर्ट आणि राष्ट्रीय राजधानीतील काही ठिकाणी सुरक्षा वाढवण्यात आली आहे. अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने त्याची याचिका फेटाळल्यानंतर त्याला भारतात प्रत्यार्पित करण्याच्या प्रक्रियेला अंतिम रूप देण्यात आले आहे.
Powered By Sangraha 9.0