फडणवीस सरकारचा निर्णय;नागपूर ग्रामीणमध्ये उभारले जाणार सहा नवीन पोलीस ठाणे

10 Apr 2025 15:10:13
 
Devendra Fadnavis
 (Image Source : Internet)
नागपूर :
वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी आणि ग्रामीण भागातील सुरक्षा यंत्रणा अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने राज्य सरकारने नागपूर जिल्ह्यातील सहा नवीन पोलीस ठाण्यांची घोषणा केली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांच्या मार्गदर्शनाखाली हा निर्णय घेण्यात आला असून, जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी याबाबत अधिकृत माहिती दिली.
 
ग्रामीण नागपूरमध्ये वडोदा, बाजारगाव, मोहपा, पचगाव, नांद आणि कन्होली बारा या गावांमध्ये ही नवीन पोलीस ठाणे स्थापन केली जाणार आहेत. बुधवारी पार पडलेल्या आढावा बैठकीत बावनकुळे यांनी या ठिकाणी पोलीस ठाण्यांच्या बांधकामाला तातडीने सुरुवात करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
 
गावागावात वाढत चाललेले गुन्हे आणि नागरिकांमधील असुरक्षिततेची भावना लक्षात घेता ही पावले उचलण्यात आली आहेत. नवीन पोलीस ठाण्यांमुळे केवळ कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहणार नाही, तर गावकऱ्यांना तातडीने मदत मिळणे शक्य होणार आहे,”असे बावनकुळे यांनी यावेळी सांगितले.
 
या बैठकीस मुख्यमंत्री सचिव डॉ. श्रीकर परदेशी आणि पोलीस आयुक्त रवींद्र सिंगलही उपस्थित होते. डॉ. परदेशी यांनी प्रशासनाकडून या प्रकल्पाला पूर्ण सहकार्य दिले जाईल, असे आश्वासन दिले.
.
Powered By Sangraha 9.0