महाराष्ट्रात भाजपने विधानसभा निवडणूक कशी जिंकली हे...;राहुल गांधींचा घणाघात

10 Apr 2025 16:05:56
 
Rahul Gandhi
 (Image Source : Internet)
अहमदाबाद (गुजरात) :
काँग्रेस पक्षाचे ८४वे अधिवेशन गुजरातमधील अहमदाबाद येथे पार पडत असून, या दोन दिवसीय अधिवेशनात लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी बुधवारी (१० एप्रिल) भाजप व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्ला चढवला.
बांगलादेशचे राष्ट्रपती उलट उत्तर देतात आणि आपल्या पंतप्रधानांसोबत बसलेले मोदी मात्र एकदम गप्प बसतात. कुठं गेली ५६ इंचाची छाती? देशाचा पंतप्रधान समोर झुकतो, आणि हेच आजचं वास्तव आहे. देश आता वैतागला आहे,असे गांधी म्हणाले.
ततुम्ही बिहारच्या निवडणुकीकडे बघा. महाराष्ट्राच्या लोकांना विचारा, ते सांगतील भाजपने महाराष्ट्रात निवडणूक कशी जिंकली. आम्ही मतदार यादी मागून मागून थकलो, पण निवडणूक आयोग आजपर्यंत ती यादी देऊ शकलेला नाही. ही खरी स्थिती आहे, पण बदल जवळ आलाय. लोकांचा मूड बदलतोय, ही विचारधारेची लढाई आहे.
 
या अधिवेशनात राहुल गांधींनी राज्यघटनेवर होणाऱ्या कथित आक्रमणावरही चिंता व्यक्त केली. ही राज्यघटना केवळ एक दस्तऐवज नाही, तर गांधीजी, आंबेडकर, पटेल, बुद्ध, कबीर यांची हजारो वर्षांची विचारधारा आहे. काँग्रेसच्या रक्त आणि घामाने ही बनवली आहे. पण आज याच्यावर सतत आक्रमण होत आहे. आरएसएस आणि भाजप देशाच्या प्रत्येक संस्थेवर, विद्यापीठांवर, भाषांवर आक्रमण करत आहेत, अशी घणाघात त्यांनी केला.
 
अग्नीवीर योजना, अदाणी-अंबानींना दिलेली संपत्ती, विद्यापीठांवर आरएसएसचा अंमल हे सर्व संविधानाच्या मूळ तत्त्वांना विरोधात आहे. हे थांबवायचे असेल तर काँग्रेसच एकमेव पर्याय आहे, असे म्हणत त्यांनी काँग्रेसचे महत्त्व अधोरेखित केले.या भाषणाने आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता आहे.
Powered By Sangraha 9.0