महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत नियोजनबद्ध घोटाळा; काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खर्गेंचा भाजपवर आरोप

10 Apr 2025 15:42:33
 
Mallikarjun Kharge
 (Image Source : Internet)
अहमदाबाद :
काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) यांनी पुन्हा एकदा भाजपवर घणाघात करत महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील निकालावर संशय व्यक्त केला आहे. अहमदाबादमध्ये काँग्रेसचे अधिवेशन सुरू असताना खर्गे यांनी आपल्या भाषणात निवडणूक प्रक्रियेवर मोठे प्रश्न उपस्थित केले.55 लाख नवीन मतदार कुठून आले? भाजपने 150 पैकी 138 जागा जिंकल्या, हे नैसर्गिक नाही, नियोजित वाटतं, असा थेट आरोप करत खर्गे म्हणाले, ही निवडणूक नव्हे, ही लोकशाहीची थट्टा आहे. आम्ही अनेक निवडणुका पाहिल्या, पण असं कधीच झाले नाही.
 
ईव्हीएमवर प्रश्नचिन्ह -
खर्गे म्हणतात, तुम्ही अशी ईव्हीएम टेक्नोलॉजी बनवली आहे की जी फक्त तुमचाच विजय सुनिश्चित करते. जग बॅलेट पेपरकडे वळत आहे, आपण मात्र ईव्हीएमकडे का? ही फसवणूक थांबवली पाहिजे. भारतातही पुन्हा बॅलेट पेपरनेच निवडणुका घ्यायला हव्यात,असेही ते म्हणाले.
 
मोदींवरही जोरदार टीका -
केवळ निवडणूकच नव्हे, तर देशाच्या आर्थिक धोरणावरही खर्गेंनी चिंता व्यक्त केली. "सरकारची संपत्ती श्रीमंत मित्रांच्या हातात दिली जात आहे. पंतप्रधान मोदी एक दिवस देशच विकून टाकतील, अशी भीती वाटते,असेही ते म्हणाले.हा लढा केवळ विरोधकांचा नाही, तर प्रत्येक सामान्य नागरिकाचा आहे. जेव्हा लोकशाहीच धोक्यात येते, तेव्हा आवाज उठवणं गरजेचे असते,असेही ते म्हणाले.
.
Powered By Sangraha 9.0