(Image Source : Internet)
नागपूर :
नाशिककरांना अवघ्या काही तासात प्रभू रामचंद्रांचे दर्शन घेणे शक्य होणार आहे. कारण नाशिक ते अयोध्या अशी विमानसेवा (Flight service) सुरु होत आहे. नाशिकच्या ओझर विमानतळावरून 31 मार्च मध्यरात्री पासून प्रमुख पस्तीस शहरांसाठी कनेक्टिंग विमानसेवा सुरू करण्यात आली आहे.
नाशिकमधून आता श्रीनगर आणि अयोध्येचा प्रवास अवघ्या काही तासांमध्ये करता येणार आहे. नाशिक ते अयोध्या विमानसेवा सुरु झाल्याने भाविकांना आता या तिर्थक्षेत्रांचे दर्शन घेणे अधिक सोपे होणार आहे. नाशिकच्या ओझर विमानतळावरुन 31 मार्चपासून देशातील 35 प्रमुख शहरांसाठी कनेक्टिंग विमानसेवा सुरु होणार आहे. यामध्ये अयोध्या, दरभंगासह, तिरुपती, श्रीनगर, चंदिगड, गुवाहाटी, कोइंबतूर, कोलकाता अशा 35 प्रमुख शहरांचा समावेश आहे.