बलात्कार प्रकरणात 'मेरा येशु येशु' फेम पाद्री बजिंदर सिंगला जन्मठेपेची शिक्षा

01 Apr 2025 13:40:07
 
Mera Yeshu Yeshu fame
 (Image Source : Internet)
चंडीगड़ :
मोहाली न्यायालयाने बलात्कार प्रकरणात आज मंगळवार १ एप्रिल रोजी स्वयंघोषित 'मेरा येशु येशु' फेम (Mera Yeshu Yeshu fame) पाद्री बजिंदर सिंग यांना मोहाली कोर्टाने २०१८ च्या बलात्कार प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
 
बजिंदर सिंग जालंधरमधील ताजपूर येथे द चर्च ऑफ ग्लोरी अँड विस्डम आणि मोहालीतील माजरी येथे दोन चर्च चालवतो आणि स्वतःला "प्रेषित बजिंदर" म्हणतो.
 
मोहाली न्यायालयाने बलात्कार प्रकरणात आज (मंगळवार, १ एप्रिल) न्यायालयाने बजिंदर सिंगला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. या प्रकरणातील शेवटची सुनावणी २८ मार्च रोजी झाली होती. सर्व पुरावे आणि साक्षीदारांच्या आधारे न्यायालयाने बजिंदर सिंगला बलात्कार प्रकरणात दोषी ठरवले.
 
हा बलात्काराचा खटला २०१८ सालचा आहे, ज्यामध्ये पाद्री बजिंदर सिंगला मोहालीच्या जिल्हा न्यायालयाने दोषी ठरवले आहे. पीडितेच्या म्हणण्यानुसार ती गेल्या ७ वर्षांपासून न्यायासाठी न्यायालय आणि पोलिस ठाण्यात चकरा मारत आहे. पीडितेने दावा केला की तिच्यासारख्या इतर अनेक महिलांचे पाद्री बजिंदर सिंगने शोषण केले होते.
 
न्यायालयाच्या निकालानंतर पीडितेच्या पतीने प्रतिक्रिया देताना म्हटलं की,आम्ही या केससाठी सात वर्ष संघर्ष केला. त्याने न्यायालयाला भरकटवण्याचा प्रयत्न केला. दरम्यान न्यायालयाचा आदेश झुगारुन तो अनेकदा परदेशात गेला होता. माझ्यावर खोटी केस दाखल करण्यात आली, आमच्यावर हल्ला करण्यात आला, मी सहा महिने जेलमध्ये घालवले. त्यानंतर आम्ही बिजंदरला धडा शिकवण्याचे ठरवले होते. न्यायव्यवस्थेवर आमचा विश्वास होता. आम्ही न्यायालयाच्या निकालाचे स्वागत करतो.
Powered By Sangraha 9.0