महाराष्ट्रावर ३ दिवस अवकाळी पावसाचे संकट;‘या’ जिल्ह्यांत गारपिटीचा इशारा

    01-Apr-2025
Total Views |
 
Unseasonal rains
 (Image Source : Internet)
मुंबई :
राज्यात काही दिवसांपासून वाढत्या तापमानामुळे नागरिक हैराण झाले आहेत. यातच हवामान विभागाकडून ठिकठिकणी ३ दिवस अवकाळी पावसाचे (Unseasonal rains) संकट असल्याचे सांगण्यात येत आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. इतकेच नाही, तर काही जिल्ह्यांमध्ये गारपीट होण्याचाही इशारा देण्यात आला आहे.
 
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुढील तीन दिवसांत राज्यातील काही भागांमध्ये अवकाळी पावसासह गारपीट होण्याची शक्यता आहे. विशेषतः पुणे , नाशिक, अहिल्यानगर, जळगाव आणि सातारा या जिल्ह्यांमध्ये गारपीट होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना उद्या (२ एप्रिल) आणि परवा (३ एप्रिल) साठी ‘ऑरेंज अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. ऑरेंज अलर्ट हा तीव्र हवामानाचा इशारा दर्शवतो, त्यामुळे नागरिकांनी अधिक सतर्क राहण्याची गरज आहे.