(Image Source : Internet)
नागपूर:
महाराष्ट्र सरकारने महिलांच्या सशक्तिकरणासाठी सुरू केलेली 'लाडकी बहीण योजना' (Ladki Bahin Yojana) महत्त्वपूर्ण ठरली आहे. या योजनेअंतर्गत महिलांना सध्या तरी 1500 रुपये हफ्ता देण्यात येत आहे.
जुलै 2024 ते मार्च 2025 दरम्यान महिलांना हप्त्यांचे वितरण करण्यात आले आहे. आता एप्रिल महिन्याचा हफ्ता कधी मिळणार याची महिलांना प्रतिक्षा होती.
महिला लाभार्थ्यांना एप्रिल महिन्याच्या हप्त्याचे वितरण चौथ्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महिलांना आपल्या हप्त्याची अपेक्षा असताना, त्यांना अजून काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे.