गुजरातमधील बनासकांठा येथील फटाका फॅक्ट्रीत स्फोट,१३ जणांना मृत्यू

    01-Apr-2025
Total Views |
- मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता

Explosion at firecracker factory(Image Source : Internet) 
बनासकांठा:
गुजरात (Gujarat) येथील बनासकांठा या ठिकाणी असलेल्या फटाका फॅक्ट्रीत स्फोट झाल्याने भीषण आग लागली. या घटनेत आतापर्यंत १३ जणांनाच मृत्यू झाल्याची माहिती असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या घटनेनंतर मदत आणि बचावकार्य सुरु करण्यात आले आहे.
 
१ एप्रिलच्या दिवशी बनासकांठा या ठिकाणी असलेल्या फटाका फॅक्ट्रीला आग लागली आणि त्यानंतर स्फोट झाले. या आगीत अनेक कर्मचारी अडकून पडल्याची भीती आहे. आज सकाळच्या सुमाराला ही घटना घडल्याची माहिती समोर आली आहे.१३ जणांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती जिल्हाधिकारी मिहिर पटेल यांनी दिली आहे.
 
डिसा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजय चौधरी यांनी सांगितलं की फटाका फॅक्ट्रीत आग लागल्याने सलग स्फोट झाले आणि आगीचा भडका उडाला. स्फोट इतके भीषण होते की छताचा भाग खाली कोसळला. त्या ढिगाऱ्याखालीही लोक अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत असून बचावकार्य सुरु करण्यात आले आहे.