(Image Source : Internet/ Representative)
नागपूर:
गुन्हे शाखेच्या एनडीपीएस सेलने माजी नगरसेवकाच्या मुलाने चालवलेल्या गांजा तस्करी रॅकेटचा (Ganja smuggling racket) पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी रॅकेटमधील एका सदस्याला अटक केली आणि त्याच्याकडून ८ किलो गांजा जप्त केला. आरोपीचे नाव मजहर उर्फ बिलाल अब्दुल जब्बार (२९) असे आहे. तो भिलगावचा रहिवासी आहे. त्याचे प्रमुख साथीदार अर्सलान मन्सूर खान आणि मोहम्मद झहीर अन्सारी फरार आहे.
अर्सलानचे वडील माजी नगरसेवक आहेत. भिलगाव परिसरात अर्सलानचे वर्चस्व आहे. तो गांजाची तस्करी करतो. बिलाल मोमिनपुरा येथे राहत होता. तो अर्सलानसोबत हातमिळवणी करण्यासाठी ६ महिने आधी भिलगावला राहायला आला होता. त्याने येथून गांजा विकायला सुरुवात केली. एनडीपीएस सेलला याची माहिती मिळाली. पीआय गजानन गुल्हाणे यांच्या पथकाने भिलगावमध्ये छापा टाकला आणि बिलालला पकडले. त्याने अर्सलान आणि झहीरची नावे सांगितली. अर्सलान या प्रकरणाचा मख्य आरोपी असून तो फरार आहे. तो सापडल्यानंतरच रॅकेटचे सत्य बाहेर येऊ शकेल. आरोपीविरुद्ध कळमना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.