बीड जिल्हा कारागृहात दोन गटात वाद; वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुलेला मारहाण झाल्याची माहिती

31 Mar 2025 15:04:38
 
Valmik Karad and Sudarshan Ghule
 (Image Source : Internet)
बीड :
बीडमधील (Beed) मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात बीडच्या जिल्हा कारागृहात जोरदार राडा झाल्याची माहिती समोर आली आहे. यादरम्यान वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुले यांना मारहाण झाल्याची माहिती समोर आली आहे.
 
कारागृहातील कैद्यांच्या दोन गटांमध्ये वाद उफाळल्याने आज सकाळच्या सुमारास हा राडा झाल्याचे समोर येत आहे. बीड जिल्हा कारागृहात आज सकाळच्या वेळी बबन गीते यांचे समर्थक कैदी आणि परळीतील विरोधी गटातील कायद्यांमध्ये जोरदार भांडणं झाले. मकोका कायद्याअंतर्गत शिक्षा भोगत असलेला अक्षय आठवले नावाचा आरोपी व महादेव गीते हा आरोपी कराड आणि घुले यांच्या अंगावर धावून गेल्याची माहिती समोर येत आहे. अद्यापही या हल्ल्याबाबत जेल प्रशासनाने अधिकृत माहिती दिलेली नाही. या घटनेमुळे कारागृहाच्या सुरक्षाव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे.
 
Powered By Sangraha 9.0