(Image Source : Internet)
नागपूर :
काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी चंद्रपूरमध्ये बोलतांना गुढीपाडव्याबाबत वादग्रस्त विधान केले. यावरून मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मी गुढी-बिढी काही उभारत नाही. छत्रपती संभाजी महाराजांचा खून झाला त्याचा हा दुसरा दिवस आहे. आम्ही काय आनंदाची गुढी उभारावी? त्यामुळे आम्ही या भानगडीत पडत नाही, असे वडेट्टीवार म्हणाले.
चंद्रपूर जिल्हा ग्रामीण आणि शहर काँग्रेसच्या वतीने चंद्रपूर शहरात राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. यावेळी वडेट्टीवार यांच्या हस्ते या कुस्ती कार्यक्रमाचा समारोप आणि बक्षीस वितरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
त्यावेळी बोलतांना विजय वडेट्टीवार यांनी हे विधान केले. एकीकडे विजय वडेट्टीवार यांनी हे वादग्रस्त विधान केले. तर दुसरीकडे सोशल मीडिया अकाऊंटवर काल (रविवार) एक ट्विट करत गुढीपाडव्याच्या शुभेच्छाही दिल्या होत्या. यामुळे उलट -सुलट चर्चा सुरु झाल्या आहेत.