(Image Source : Internet)
नागपूर :
नरेंद्र मोदींचा पुढचा वारसदार महाराष्ट्रातून असेल आणि तो संघ ठरवेल,असे विधान ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केले. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी नागपुरात प्रसार माध्यमांशी संवाद साधताना प्रत्युत्तर दिले.
मोदीजी आमचे नेते आहेत. अजून बरेच वर्ष मोदीजी काम करणार आहेत. आमचा सगळ्यांचा आग्रह आहे. आम्ही 2029चे पंतप्रधान म्हणून मोदीजींकडेच बघतो आहे. पूर्ण देश बघतो आहे. त्यामुळे आता अशी चर्चा करणं योग्य होणार नाही. भारतीय संस्कृतीमध्ये वडील जिवंत असताना मुलांचा विचार होत नाही. करायचाही नसतो. आता कुणाचाही, कुठेही उत्तराधिकारी निवडण्याची वेळ आलेली नाही. जोपर्यंत माझा विषय आहे. माझा त्याच्याशी संबंधही नाही. असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
औरंगजेबाच्या कबरीच्या मुद्यावरही फडणवीस यांनी भाष्य केले. आमची भूमिका स्पष्ट आहे. ही जी काही कबर आहे, ही एएसआयची प्रोटेक्टेड आहे. त्यामुळे आम्हाला औरंगजेब आवडो की ना आवडो, 50-60 वर्षापूर्वी कायद्याने प्रोटेक्शन मिळालं आहे. त्यामुळे कायद्याचं पालन करणं आमची जबाबदारी आहे. पण औरंगजेबाच्या कबरीचे उदात्तीकरण होऊ देणार नाही हे मात्र निश्चित, असे फडणवीस म्हणाले.