राजकारण संपलं तरी चालेल,पण शरद पवारांच्या पुढे कधीही झुकणार नाही;भाजपच्या 'या' नेत्याचे विधान

    31-Mar-2025
Total Views |

Gore targeted Sharad Pawar
 (Image Source : Internet)
मुंबई :
भाजपने राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे (Jayakumar Gore) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर निशाणा साधला.
 
मी मंत्री झालो, पण हे शरद पवारांना अजूनही मान्य होत नाही. माण खटावच्या ओकांनी मला निवडून दिले. मी आमदार झाल्यानंतर शरद पवार यांच्यासह त्यांच्या पक्षातील लोकांच्या पोटात दुखू लागले. मी आमदार झालो हे त्यांनी १० वर्ष मान्य केलं नाही. आता आमदार झालो हे मान्य झालं, पण मंत्री झालो हे मान्य होत नाही. आजपर्यंत सर्व नेत्यांनी त्यांच्याबरोबर तडजोड केली असेल, पण या पश्चिम महाराष्ट्रातील मी एकमेव व्यक्ती आहे कधीही पवारांच्या पुढे झुकलो नाही आणि कधी झुकणारही नाही, माझं राजकारण संपलं तरी चालेल, असे विधान मंत्री जयकुमार गोरे यांनी केले.