औरंगजेबाचा मुद्दा अनावश्यकपणे उकरून काढला जातोय;संघाच्या भय्याजी जोशींचे परखड मत

    31-Mar-2025
Total Views |
 
Bhaiyaji Joshi
 (Image Source : Internet)
नागपूर :
औरंगजेबाच्या (Aurangzeb) कबरीवरून सुरू असलेला वाद पेटतच चालला आहे. औरंगजेबाची कबर हटवण्यात यावी, अशी मागणी बजरंग दल व विश्व हिंदू परिषदेकडून करण्यात आली आहे. यानंतर नागपुरात मोठा हिंसाचार घडला. यावर आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. काही दिवसांपूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी पत्रकार परिषदेमध्ये औरंगजेबाच्या कबरीसंदर्भात भूमिका मांडली होती.आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते भैय्याजी जोशी नागपूरमध्ये एका कार्यक्रमासाठी उपस्थित असताना या मुद्द्यावर आपले मत मांडले.
 
औरंगजेबाचा मुद्दा अनावश्यकपणे उकरून काढला जात असल्याचे जोशी म्हणाले. तसेच, ज्यांची श्रद्धा असेल ते लोक औरंगजेबाच्या कबरीवर जातील, असेही त्यांनी नमूद केले.
 
औरंगजेबाच्या कबरीचा विषय अनावश्यकपणे चर्चिला जात आहे. औरंगजेबाचा मृत्यू इथे झाला तर त्याची कबर इथेच असणार. काही लोकांची श्रद्धा असेल तर ते तिथे जातील. छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श आहे. त्यांनी तर अफजलखानाचीही कबर किल्ल्यावर बनवली आहे. हे भारताच्या उदारतेचे सर्वसमावेशकतेचं प्रतीक आहे, असेही भैय्याजी जोशी म्हणाले.