(Image Source : Internet)
नागपूर:
पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आज रविवारी नागपूर दौऱ्यावर असून, नागपूरमध्ये त्यांचे आगमन झाले आहे. या दरम्यान, पंतप्रधान मोदी रेशम बाग येथील संघाच्या मुख्यालयाला भेट दिली.संघाचे संस्थापक डॉ. केशव बळीराम हेडगेवार आणि दुसरे सरसंघचालक माधव सदाशिव गोळवलकर यांच्या समाधीस्थळाचे त्यांनी दर्शनात घेतले तसेच पुष्पांजली वाहिली. यानंतर मोदी हे दीक्षाभूमीला भेट देणार आहेत.
नागपूर भेटीदरम्यान, पंतप्रधान मोदी विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होणार आहेत. ज्यामध्ये अत्याधुनिक माधव नेत्रालयाच्या भूमीपुजनाचाही समावेश आहे.