पंतप्रधान नरेंद्र मोदी दीक्षाभूमीत दाखल; डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना केले अभिवादन

30 Mar 2025 12:19:24
 
Modi arrives at Deeksha Bhoomi
 (Image Source : Internet)
नागपूर :
पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आज नागपूरच्या दौऱ्यावर आले आहेत. सर्वप्रथम राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्मृती मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भेट दिली आहे. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ताफा पवित्र दीक्षाभूमीत दाखल झाला . दीक्षाभूमीवर पंतप्रधान मोदी यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीला आदरांजली वाहिली. तसेच भगवान गौतम बुद्धांना अभिवादन केले. जवळपास 5 मिनिटं पंतप्रधान नरेंद्र मोदी या ठिकाणी ध्यान साधना केली.
 
दरम्यान मोदी यानंतर नागपूर दौऱ्यातील सर्वात महत्त्वाच्या कार्यक्रमस्थळाला जाण्यासाठी प्रस्थान करणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दीक्षाभूमीतून हिंगणा इथल्या माधव नेत्रालयाच्या नव्या वास्तूचं भूमिपूजन सोहळ्याला जाण्यासाठी निघतील. साधारपणे 10 वाजता ते मुख्य कार्यक्रमस्थळी पोहोचतील. या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सरसंघचालक डॉ. मोहन भागवत, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि स्वामी अवदेशानंद मंचावर राहणार आहेत. 11 वाजून 30 मिनिटांनी पंतप्रधान मोदी हे नागपूर विमानतळाला जातील. तिथून बाजरगाव येथे असलेल्या सोलार कंपनीला ते भेट देणार आहेत.साधारपणे 45 मिनिटं पंतप्रधान सोलर इंडस्ट्रीत थांबल्यानंतर ते पुन्हा नागपूर विमानतळावर येतील आणि दुपारी 1 वाजून 40 मिनिटांनी ते दिल्लीसाठी प्रस्थान करणार आहेत.
Powered By Sangraha 9.0