महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा

29 Mar 2025 20:20:16
 
Warning of rain
 (Image Source : Internet)
मुंबई:
राज्यात उष्णतेची लाट पाहायला मिळत आहे. विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये तापमान 40 अंश सेल्सिअसच्या पुढे पोहोचलं असून, उष्णतेची तीव्र लाट पाहायला मिळत आहे. वाढलेल्या तापमानामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. मात्र दुसरीकडे आता पुन्हा एकदा महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
 
मध्य महाराष्ट्र आणि कोकणात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.हवामान विभागाकडून देण्यात आलेल्या इशार्‍यानुसार पुढील 24 तासांमध्ये कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.
 
आयएमडीने दिलेल्या माहितीनुसार केरळपासून ते महाराष्ट्रातापर्यंत अनेक राज्यात सध्या कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे, त्यामुळे अनेक राज्यांना अवकाळी पावसाचा तडाखा बसण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांना सतर्कतेचे आवाहन करण्यात आले आहे.
Powered By Sangraha 9.0