म्यानमारमध्ये भूकंपामुळे 1000 जणांचा बळी, थायलंडसह पाच देशांना हादरले,मृतांचा आकडा वाढण्याची भीती

    29-Mar-2025
Total Views |
 
Earthquake in Myanmar
 (Image Source : Internet)
मुंबई :
म्यानमार (Myanmar) काल म्हणजचे शुक्रवारी 28 मार्च रोजी भूकंपाच्या तीव्र झटक्याने हादरले. यावेळी 1000 पेक्षा जास्त लोकांना मृत्यू झाल्याचे कळते आहे. या भूकंपाची तीव्रता ही 7.7 इतकी होती. त्यातून याचा झटका थायलँडलाही बसला आहे. बँकॉकमध्येही याने मोठे नुकसान झाले. इमारती हादरल्या, गाडी खेळण्याप्रमाणे हलू लागल्या, जमीन थरथरू लागली अन् लोकंही सैरावैरा पळू लागले.
 
म्यानमारमध्ये झालेल्या शक्तिशाली भूकंपात 1000 हूनअधिक लोकांचा मृत्यू झाला आहे आणि 2000 हून अधिक लोक जखमी झाले आहेत, असे वृत्त आहे. या आकाड्यांमध्ये बदल होऊ शकतो.
 
भारताकडून मदतीचा हात -
म्यानमारचे जंटा प्रमुख मिन आंग ह्लाईंग यांनी राज्य प्रसारक एमआरटीव्हीवरील दूरचित्रवाणी भाषणात आपत्तीची तीव्रता सांगितली, ''मी मदतकार्यासाठी आंतरराष्ट्रीय मदतीची विनंती केली आहे आणि एएचए सेंटर आणि भारताकडून काही मदतीची ऑफर मंजूर केली आहे, असे त्यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी म्यानमार व थायलंडमध्ये झालेल्या भूकंपामुळे उद्भवलेल्या परिस्थितीबाबत चिंता व्यक्त केली. ते म्हणाले, अडचणीच्या प्रसंगी भारत या दोन्ही देशांच्या बरोबर उभा आहे. दोन्ही देशांना लागेल ती मदत करण्यास भारत तयार आहे.