अभिनेता सलमान खानच्या फॅनचा नादाच खुळा; 'सिकंदर'ची दीड लाखांची तिकीटं खरेदी करुन प्रेक्षकांना वाटल्या !

    29-Mar-2025
Total Views |
 
Salman Khan
 (Image Source : Internet)
मुंबई :
अभिनेता सलमान खानचा (Salman Khan) 'सिकंदर' सिनेमा 30 मार्चला सिनेमा गृहात प्रदर्शित होत आहे. या सिनेमात सलमान खानची प्रमुख भूमिका आहे. 'सिकंदर' निमित्ताने सलमानचा अनेक वर्षांनी बिग बजेट सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत असल्याने सगळ्यांमध्ये कमालीची उत्सुकता आहे. यानिमित्ताने सलमानच्या चाहत्याचा एक व्हिडीओ व्हायरल होतो. या व्हिडीओत सलमानच्या चाहत्याने तब्बल दीड लाखांची तिकीटं खरेदी करुन ती सर्वांना वाटली आहेत.
 
सिकंदर' सिनेमात सलमान प्रमुख भूमिकेत असून त्यासोबत रश्मिका मंदाना, सत्यराज, शर्मन जोशी, प्रतीक बब्बर हे कलाकार झळकणार आहेत. 'गजनी' सिनेमाचे दिग्दर्शक ए.आर. मुरुगोदास यांनी 'सिकंदरचे दिग्दर्शन केले.
 
दरम्यान भाईजानचा मोठा चाहता असलेल्या कुलदीप कसवानने राजस्थानमधील एका थिएटरमध्ये जाऊन तब्बल दीड लाखांची तिकीटं खरेदी केली. सलमानच्या लवकरच रिलीज होणाऱ्या 'सिकंदर' सिनेमाची तिकीटं या चाहत्याने खरेदी केली आहेत. ही तिकीटं खरेदी करुन कुलदीपने प्रेक्षकांमध्ये ही तिकीटं वाटून टाकली. यासाठी कुलदीपने प्रेक्षकांकडून कोणतेही पैसे घेतले नाहीत. फुकट मिळणाऱ्या तिकीटी घेण्यासाठी प्रेक्षकांनी गर्दी केली होती.