(Image Source : Internet)
नागपूर :
राज्यात गेल्या काही दिवसांपासून राजकीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी यासंदर्भात भाष्य केले. आम्ही मुस्लिम विरोधी नाही, पण भारतात राहून पाकिस्तानचा झेंडा फडकवणाऱ्या लोकांच्या विरोधात आहोत. त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या नाशिक आणि परभणीतील रॅलींमध्ये पाकिस्तानचे झेंडे फडकवल्याचा आरोप केला. पाण्यासाठी तरुण शेतकरी आत्महत्या करतो हे देशाचे दुर्दैव आहे, असे वक्तव्य चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले आहे.
नागपूरमध्ये उसळलेली दंगल आणि मुस्लिम समाजाच्या कार्यकर्त्यांवर केलेल्या कारवाईमुळे भाजपच्या विरोधात अल्पसंख्यक समाजामध्ये मोठा रोष निर्माण झाला आहे. आम्हाला टार्गेट केले जात आहे, असा त्यांचा आरोप आहे. दंगलीला प्रोत्साहित करणाऱ्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले नाहीत असाही रोष आहे. या सर्व घटनाक्रमावर बावनकुळे यांनी मत व्यक्त केले.
नागपूरमधील दंगलीनंतर काँग्रेसने सत्य शोधन समिती स्थापन केली आहे. समितीने भाजप आणि पोलिसांच्या भूमिकेवर शंका व्यक्त केली आहे. राज्यपालकांकडे तक्रारसुद्धा केली आहे. विशिष्ट समाजाला सरकार टार्गेट करीत आहेत. त्यांच्या घरावर बेकायदेशीर बुलडोजर चालवला जात आहे. देशद्रोहाचे गुन्हे दाखल केले जात असल्याचा आरोप सत्य शोधन समितीने केला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी भाजपची भूमिका स्पष्ट केली.