(Image Source : Internet)
मुंबई :
शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे मंत्री संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी उद्धव ठाकरे गटावर सडकून टीका केली आहे. ठाकरे ब्रॅण्ड संपलेला आहे. बाळासाहेबांची शिवसेना जिवंत आहे. बाळासाहेबांचे विचार जिवंत आहेत. ठाकरे गटावर आम्हाला बोलायची आवश्यकता वाटत नाही. आम्ही आमच्या पद्धतीने काम करत आहोत. शिवसेनाप्रमुखांचे विचार पुढे नेण्याचा आमचा निर्धार आहे. त्यामध्ये कोणी आडवे आले, तर त्याला आडवे करण्याची ताकद आमच्यात असल्याचा घाणघातही शिरसाट यांनी केला.
पत्रकारांशी बोलताना संजय शिरसाट म्हणाले की, ज्यांच्यासोबत राहायचे नाही, तुम्ही त्यांच्यासोबत राहत आहात. शरद पवार आणि राहुल गांधी यांच्याबरोबर तुम्ही केलेली आघाडी देशाने पाहिली आहे. हे तुम्हाला आवडत असेल, तर तुम्ही त्यांच्यासोबत संसार करा. आमचा संसार इथे चांगला सुरू आहे, असेही शिरसाट ठाकरे गटाला म्हणाले.